#

Advertisement

Monday, August 1, 2022, August 01, 2022 WIB
Last Updated 2022-08-01T12:13:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पाठच्या भावासारखी साथ देणाऱ्या वसंतरावांना विनम्र श्रद्धांजली !

Advertisement

माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले मन मोकळे

सोलापूर : स्वर्गीय वसंतराव मुदगुल शेठजींच्या आशिर्वादाने 1985 मध्ये निवडून आलो, आमदार झालो. आज, त्यांची साथ सुटली आहे. वसंतराव मुदगुल यांना शाहू परीवारातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो, असे सांगत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मन मोकळे केले.

पहिल्या बैठकीतच संजय निराधार योजनेचे सदस्य म्हणून वसंतराव मुदगुल यांची ओळख झाली. शिक्षण कमी असले तरी राजकारणातले वकुब आणि धाडस अधिक होते. चार डांबापर्यंतचे राजकारण सांभाळताना गृहनिर्माण संस्थेचे शंकर पवार, किसनराव मुदगुल, वसंतराव मुदगुल या तिघांनी शनिवार पेठ सांभाळावी, असा शेठजींचा आग्रह असायचा त्याला पै. दामोदर मंडले, महादेव जाधव, सुरेश पवार यांचे सहकार्य असायचे. खडी क्रशरचा उद्योग सांभाळत स्वर्गीय वसंतरावांनी परीवार माय बहिणी, भाचे, मुलांचे नातू या सगळ्यांचा अंतःकणातून सांभाळ केला. कधी कधी शनिवार पेठेत निखराचा संघर्ष झाला. अनेक अडचणी संकट येत गेली त्या सर्व अडचणींना धीराने तोंड देणारा नेता होता. कारण, राजकारणात वाढविलेले अनेक कार्यकर्त्यांचे नेते झाले आणि फळ असलेल्या झाडावर उडून गेले. परंतु, जीवाभावाचा सहकारी म्हणून संकटात देखील वसंतराव माझ्याबरोबर राहिले. तर, सांगोला रस्त्यावरच्या मंदिरासाठी नेहमीच वसंतरावांनी कष्ट घेतले.

ऋणानुबंध जुळून आले
अकोला रस्त्याची शेती, म्हशी पालनाचा व्यवसाय, खडी क्रशरचा उद्योग शेवटपर्यंत प्रामाणिकपणाने केला. शनिवार पेठेत 2 ते 3 कुटुंब वराह पालन करायचे स्वर्गीय वसंतरावांनी मदत केली आणि वराह पालन हद्दपार केले. समाजाला घाणीच्या व्यवसायातून उद्योगात आणले. मधून-मधून भोसरीच्या जावयाकडे वसंतराव यायचे आणि मी देखील राणी पुतळाबाई कॉलेजवर जावयाच्या घरी जायचो. दोघांचा संध्याकाळचा बेत व्हायचा आणि सोलापूरात अशोक चौकात आम्ही दोघजन लेकीकडे जेवायला जायचो, असे ऋणानुबंध जुळून आले होते. सातत्याने 35 वर्षे सहवासात राहिलो.

धाडसी मोहिमा आखल्या
महाराष्ट्रात अनेक ठिकाणच्या धाडसी मोहिमा आखल्या. स्व. वसंतरावांनी दारूच्या थेंबाला हात लावला नाही. सर्व नातू शिक्षणात तरबेज केले. राज्याच्या सामाजिक संघटनेला मंगुडकरांसोबत मदत केली. एखादी गोष्ट राजकारणात पटली नाही तर याला मी मदत करणार नाही, असे वसंतराव सांगायचे. नेहमीच प्रवासात राज्यभरात फिरताना वसंतरावांच्या कमरेला रिव्हालवर असायचे. परंतु, त्याचा कधीच वापर झाला नाही. वागणेच एवढे रुबाबात होते की त्यांचा आवाज आणि शब्द गोळी सारखा घुसायचा. तर, हात गजासारखा लागायचा.

...तेंव्हा त्यांची पारे येऊन जायची
दहीवडीच्या यात्रेतून लक्ष्मीआईच्या देवीपासून बठाण रोडच्या तांबुर तळ्याच्या म्हसोबापर्यंत सतत मित्र परीवारासाठी कंदोरीचे जेवण असायचे. तसेच घरात, गल्लीत आणलेली कोणत्याही चार पाचायची शिकार असेना त्यामध्ये माझी देखील वाटणी घरपोच व्हायची. चार वर्षापूर्वी घराजवळ दामाजी सोसायटीमध्ये दगडं पडायची तरी स्व. वसंतरावांच्या परीवारतली चार पोरं चक्कर मारून जायची.

वडिलकीचे आशिर्वाद कायम
दामाजी गृह निर्माणवर वसंतरावांचे लक्ष असायचे. माझे सहकारी बंडु लाळे, रोंगेकर बंदुकवाले, मल्लू हवीनाळे, अरूण किल्लेदार, भुजंगराव पाटील, रमेश जोशी वकील, आदरणीय बडोदकर वकील, सहकारी प्रविण हजारे, पै. दामोदर मंडले, सहकारी आप्पा चोपडे, पांडुरंग होनमाने, स्व. हिरालाल आदरणीय चिंचकर, अशोक माने, या सर्वांचा मोलाचा सल्ला असायचा. आजही महादेव जाधव काळजीपूर्वक काम करीत असतात. उपरोक्‍त मंडळींनी गेली 25 वर्षे सत्तेच्या वैभवाचे राजकारण करताना पाठच्या भावासारखी साथ दिली. तर वडिलकीचे आशिर्वाद दिले. माझे सहकारी म्हणून वसंतराव मुदगुल यांच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

- प्रा. लक्ष्मण ढोबळे , माजी मंत्री, भाजप प्रांतिक कार्यकारिणी सदस्य