#

Advertisement

Wednesday, August 10, 2022, August 10, 2022 WIB
Last Updated 2022-08-10T12:46:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कोमलताई या "वसुंधरा'च, त्यांचे कार्य माय-माऊली प्रमाणे !

Advertisement




हभप महेश महाराज मडके यांचे प्रतिपादन

आळंदी : प्रत्येक स्त्री ही आई होत असते. आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर मातृत्वाचे कर्तव्य ती निभावते. परंतु, माय होणे..,माऊली होणे तेवढेच अवघड आहे. त्यातही जगासाठी वसुंधरा म्हणजेच समाजासाठी कार्यरत राहणारी माऊली होणे कठीण. आज, आपल्याकडे "वसुंधरे'च्या रूपात कोमलताई सांळुखे-ढोबळे आल्या आहेत, त्यांचे कार्य खरोखरच माय-माऊली प्रमाणे आहे, असे प्रतिपादन हभप महेश महाराज मडके यांनी केले.
आळंदी येथील साईबाबा मुला-मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये वसुंधरा प्रतिष्ठाणतर्फे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. या शाळेमध्ये अनाथ तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा सांभाळ केला जातो तसेच त्यांना शिक्षण, वारकरी पंथाचे संस्कार केले जातात. या शिक्षण संस्थेचे कार्य लक्षात घेत भोसरी येथील वसुंधरा वुमन्स्‌ फाउंडेशन तसेच बहुजन रयत परिषदेच्या महिला अध्यक्षा कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्यातर्फे सदर शाळेत रक्षाबंधन सणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोमलताई यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच जेवण देण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात हभप मडके यांनी आई-माऊली या विषयावर बोलताना कोमलताई यांच्या सामाजिक उपक्रमांबाबत कौतूक केले. आपल्याला त्यांच्या सारखी ताई-माय माऊली मिळाल्याचे मोठे समाधान असल्याचे हभप मडके यांनी नमूद केले. तसेच, शाळेस मदत केल्याबद्दल आभार मानले. यावेळी बहुजन रयत परिषदेचे विशाल खंदारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

माझ्या आईचे संस्कार मोठे
आपण समाजात राहतो, समाजाचे आपल्यावर ऋण असतात, त्यामुळे समाजातील गरजूंसाठी आपण नेहमी काही तरी करीत राहायला पाहिजे, असे संस्कार माझ्या आईने तसेच वडिलांनी केले आहेत. त्यामुळेच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संस्कारजन्य उपक्रम सुरू असतात, ते मी माझे कर्तव्य समजते, अशी प्रतिक्रिया बहुजन रयत परिषदेच्य महिलाध्यक्षा कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्‍त केली. यावेळी त्यांची कन्या वसुंधरा यांनी शाळेतील सर्व मुलांना राखी बांधली. त्यांच्या सोबत खाऊ, जेवणाचा आनंद घेतला.