Advertisement
मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आणि भाजपच्या प्रत्येकी नऊ नेत्यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज संध्याकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. या खातेवाटपात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना कदाचित हव्या असणाऱ्या खात्याचं मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी आहे, अशी चर्चा सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांना महसूल मंत्रीपद हवं आहे. त्यासाठी ते आग्रही होते. पण ते खातं त्यांच्याऐवजी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील हे युती सरकारच्या काळात महसूल मंत्री होते. त्यामुळे त्यांना यावेळी सुद्धा महसूल विभागाचं मंत्रीपद हवं होतं. त्यासाठी ते आग्रही होते. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून महसूल विभागाची जबाबदारी ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. या मंत्रिमंडळ विस्तारात गुजरात पॅटर्न अवलंबला जाणार, अशी चर्चा होती. त्यानुसार नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. पण अखेर काल चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम लागला. पण चंद्रकांत पाटील यांना महसूल मंत्रीपद मिळणार नाही, अशा आहे.
