Advertisement
सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ
साठे यांची 102वी जयंती मोठ्या उत्साहात तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांतून साजरी
करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या सर्व
समाज बांधवांना अभिजित ढोबळे मित्र परिवार व अमोल वामने मित्र परिवाराच्या वतीने
अल्पोहार देऊन अन्नदानातून ऋतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी "महात्मा फुले
सुतगिरणी'चे चेअरमन अभिजित ढोबळे, बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड.
कोमल साळुंखे-ढोबळे, मुंबई येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी खंदारे,
रिपाइंचे नेते अमोल वामने, राजेश उबाळे, अजित गायकवाड, बसपा शहराध्यक्ष देवा उघडे,
नागेश पडवळकर, संतोष चोळे, विशाल खंदारे, अर्जुन सलगर, सुमित शिवशरण, सुजित अवघडे,
ऍड. राकेश गाडगे, लौकिक इंगळे, रोहन चौगुले, सागर लोंढे यांच्या हस्ते समाज
बांधवांना अल्पोपहार देण्यात आला. यावेळी मिरवणुकीमधील सहभागी झालेल्या लहान थोर
मंडळी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. या उपक्रमाच्या आयोजनात बहुजन रयत परिषदेचे
कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग तसेच सदस्यांनी परिश्रम घेतले.
