#

Advertisement

Wednesday, August 10, 2022, August 10, 2022 WIB
Last Updated 2022-08-10T12:28:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

किरीट सोमय्याआणि निल सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Advertisement

मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी संकलन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्या पितपुत्रांना दिलासा आला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्याआणि त्यांचा पुत्र निल सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर करत त्यांची याचिका निकाली काढली. दोघांविरोधात तूर्तास आर्थिक घोटाळा केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली. 
दरम्यान, किरीट आणि नील सोमय्या यांची पोलीस चौकशी सुरूच राहणार आहे. दोघांनाही अटक करण्यापूर्वी 72 तासांची नोटीस देण्याचे  पोलिसांना न्यायालयाने दिले आहेत. मुंबई पोलिसांसमोर या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचे नवे समन्स मात्र पोलिसांकडून जारी केले जाईल. पोलिसांकडून किरीट सोमय्यांची 17 ऑगस्टला तर नील सोमय्यांची 18 ऑगस्टला आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी संकल प्रकरणात पुन्हा चौकशी होणार आहे.  सोमय्या पिता-पुत्रांनी आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी संकलनातील 57 कोटी रुपये स्वतःकडे ठेवत जनतेची फसवणूक केल्याचा गुन्हा माजी लष्करी कर्मचारी बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात नोंदवला होता.