Advertisement
मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार कोसळून आणि नवं सरकार स्थापन होवून अवघे 50 दिवस होत नाही तेवढ्यात गेल्या सरकारमध्ये मंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढली आहे. जितेंद्र आव्हाड यांना मानवाधिकार आयोगाची नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढली आहे. जितेंद्र आव्हाड यांना मानवाधिकार आयोगाने नोटीस पाठवली आहे. अनंत करमुसे प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. मानधिकार आयोगाने आव्हाडांना हजर राहून उत्तर देण्यास सांगितलं आहे. जितेंद्र आव्हाड याप्रकरणी काय प्रतिक्रिया मांडतात, त्यानंतर मानवाधिकार आयोग काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जितेंद्र आव्हाड मंत्री असताना संबंधित प्रकरण समोर आलं होतं. ठाण्यात राहणाऱ्या अनंत करमुसे नावाच्या एका इंजिनिअर तरुणाने 5 एप्रिल 2020 रोजी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षा रक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी त्याचं अपहरण करत आव्हाडांच्या घरी नेल्याचा आरोप करण्यात आला होता.
