Advertisement
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षात चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळाल्याने भाजपचं प्रदेशाध्यक्षपद रिक्त होतं. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाला मिळणार याची चर्चा रंगली होती. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. आज संध्याकाळी अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आशीष शेलार यांच्याकडे मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ही महत्त्वपूर्ण जबाबादारी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
