Advertisement
मुंबई : आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंग्रजीत भाषणाला सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी मराठीत थोडं बोललेलं चालेल ना? असं विचारलं. त्यानंतर शिंदे थोडावेळ मराठीत बोलले, नंतर ते पुन्हा इंग्रजीत भाषण केलं. "घरोघरी तिरंगा हे अभियान खूप उत्साहात आणि जल्लोषात सुरु केलं आहे. आझादी का अमृतमहोत्सवामुळे खरोखरंच राज्य आणि देशभरात देशभक्तीची मोठी लाट आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगाच्या मोहिमेमुळे प्रेरणेतून संपूर्ण देश धर्म, जात, भाषा विसरुन एक झाल्याचं चांगलं चित्र पाहायला मिळत आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
