Advertisement
जळगाव: पंकजा मुंडे पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांना लवकरच मोठी जबाबदारी पक्षश्रेष्ठी देणार आहे, असे स्पष्टीकरण भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही, त्यानंतर पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. त्यावर ते बोलत होते. गिरीश महाजन म्हणाले, पंकजा मुंडे अजिबात नाराज नाहीत, त्यांच्या कामाची पक्षश्रेष्ठी दखल घेतली जात आहे. त्यांनी मला अभिनंदनासाठी फोनही केला होता. त्या नाराज आहेत, असे हॅमर करु नये. तसे चित्र लोकांसमोर जात आहे. पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामाची दखल घेत यापेक्षा चांगले पद देतील, असेही महाजन यांनी सांगितले.
