Advertisement
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यांनी ट्विट करुन आपली भावना व्यक्त केली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी न मिळाल्याने पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी वेळोवेळी विविध प्रकार आपली नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वाढदिवशी लावलेल्या फ्लेक्सवर कोणत्याही भाजप नेत्याचं नाव नव्हतं. यापूर्वीही पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार मानलं जात होतं. मात्र पक्षाकडून त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीत संधी देण्यात आली नाही. दरम्यान , कूण 18 आमदारांचा शपथविधी पार पडला. पुढील महिन्यात होणाऱ्या विस्तारात अनेकांना संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं जात आहे.
