#

Advertisement

Saturday, August 13, 2022, August 13, 2022 WIB
Last Updated 2022-08-13T17:47:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

आमदारकीचा राजीनामा देणार नाही !

Advertisement

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचादेखील राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात विधान परिषदेच्या सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा दिला नव्हता. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मात्र, उद्धव ठाकरे आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाच्या म्हणजेच आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत. विधान परीषदेत शिवसेनेचं  संख्याबळ कमी होऊ नये म्हणून शिवसेना पक्ष कार्यकारणीने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आपण विधान परीषद आमदारकीच्या राजीनाम्याचीही घोषणा केली होती. त्यांनी त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा पत्रही दिले होते. मात्र विधान परीषद सदस्याचा राजीनामा हा विधान परीषद सभापतींकडे द्यावा लागतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ग्राह्य धरला गेला नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विधान परीषद आमदार म्हणून कार्यरत आहेत. विधानपरिषदेचं संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर आमदारकीचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.