Advertisement
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अर्थात पीएमएलए अंतर्गत आर्थर रोड जेलमध्ये आहेत. आर्थर रोड जेलमधून संजय राऊत पुस्तक लिहित आहेत. संजय राऊत पत्रा चाळ प्रकरणावरच पुस्तक लिहित आहेत. मुख्य म्हणजे याच प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. आपल्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे आहेत, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असं राऊत आधीच म्हणाले आहेत. नियमानुसार सुनावणी सुरू असलेल्या प्रत्येक कैद्याला पेन, पेपर यासारख्या वस्तू लिहिण्यासाठी दिल्या जातात. याआधी संजय राऊत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनासाठी संपादकीय लिहित असल्यामुळे वाद निर्माण झाला होता. यानंतर संजय राऊत यांच्या नावाचा उल्लेख सामनामध्ये करण्यात आला नाही. रविवारी येणाऱ्या रोखठोक या संजय राऊत यांच्या सदरही हल्ली केदारनाथ मुंबईकर या नावाने लिहिलं जात आहे.
