Advertisement
व्याख्यानातून मार्गदर्शन करताना ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांचे समाजाला आवाहन
उमरगा : महाराष्ट्र राज्यात 59 जाती-जमातींचा वापर राजकारणी केवळ मतदानापुरता करून घेत आहेत. हे बदलायला हवं. यासाठी बहुजन रयत परिषद सरसावली आहे. आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी राहू, हक्काने या, काम करा, संघटना मजबूत करा, असे आवाहन बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी केले.उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरूम येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे बोलत होत्या. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, ज्येष्ठ सहकारी-मार्गदर्शक बसवराज पाटील, पं.स.सभापती सचिनदादा पाटील, नगरसेविका सुमन देडे, शेषेराव सरवदे, मल्लप्पा देडे, विनायक देडे आदी उपस्थित होते. मुरूम गावासह तालुक्यातील समाज बांधवांची मोठी उपस्थिती या व्याख्यानास होती.
ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात फिरत असताना मातंग समाज आज कसा आहे आणि उद्या तो कसा असावा याबाबत विचार येतो. खरं तर, समाजाला मोठा इतिहास आहे. हा समाज राजकारणी तसाच लढवय्या आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांतून दलित समाजात नव्य संस्कृतीची बीज रोवली गेली. परंतु, आज कोणीही यावे आणि टपली मारून जावे, अशी स्थिती होऊ पाहत आहे. यासाठी आपणच जबाबदार आहोत. परंतु, आता हे सर्व बदलणे गरजेचे आहे. आपल्याला संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क शे-दोनशे रूपयांसाठी विकू नका. निवडणुकीच्या वेळी मतांचा सौदा केला तर तुमच्या कुटुंबासह सर्व समाजाची अधोगती होते, हे विसरू नका. मन, मनगट आणि बुद्धी शसक्त असेल तर कोणीही अत्याचार करून शकत नाही. बांधवांनो आपल्या समाजाची ताकद अखंड महाराष्ट्रात पसरली आहे. ती एकरूप करणे गरजेचे आहे, हेच काम बहुजन रयत परिषद करीत आहे. मातंग समाजाची एकी हेच संघटनेचे ध्येय आहे, याच ऐकीतून आपण इतिहास घडवू शकतो. त्यामुळे एकत्र या बहुजन रयत परिषद संघटना मजबूत करा, असे आवाहन ऍड. साळुंखे-ढोबळे यांनी केले.
अण्णा भाऊ साळे यांचे साहित्य तसेच आजचा मातंग समाज आणि स्त्रीया याविषयीही ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी विविध दाखले देत अतिशय मार्मिक शब्दांत विविध प्रश्नांची उत्तरासह उकली केली. त्या म्हणाल्या की, अण्णा भाऊंचे लेखन हे वस्तवादी आहे. त्यांच्या बहुतांशी कथांच्या नायिका या स्त्रीया आहेत. माय-माऊलींची दु:ख तसेच त्यांनी दिलेला लढा त्यांनी आपल्या लेखणातून मांडला आहे. परंतु, तो आपल्यापर्यंत पोहचत नाही. कारण, आपण वाचनच करीत नाही. वाचन का करीत नाही तर आपल्या समाजातील स्त्रीयांच्या शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. आज, आपली स्त्री अडाणी असली तरी संपुर्ण कुटुंब सांभाळते. सुट्टी, रजा, आजारपण अशा सवलती घरातील स्त्री घेत नाही. तरीही तु दिवस भर काय करतेस? असा सवाल तीला केला जातो. ही परिस्थती बदली पहिजे. आणि ती शिक्षणातून बदलेल. त्यामुळे यापुढील काळात समाजाने शिक्षीत होणे गरजेचे आहे. आपल्या मुला-बाळांना शिक्षण द्या. शिक्षण हा आपला मूलभूत हक्क आहे, असे अनेक हक्क आहेत ते आपण मिळवले पाहिजेत. यासाठी कसलीही वेळ असो आता लढवय्ये झाले पाहिजे. जे काणी रिंगणातून पळ काढतील त्यांना नैराश्य आयुष्याच्या खिंडीत गाठते, हे लक्षात ठेवा. हेच सर्व प्रश्न सोडविण्यासाठी बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून एकत्र येवू. आपली ध्येय प्राती होईपर्यंत आता थांबायचे नाही, असेही ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.
