Advertisement
खडकी (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळेमध्ये जाऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास करुन कष्टकरी कामगार यांची एक चळवळ उभी केली, या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक चित्रपट, कथा, कादंबरी, लघु नाट्य हे साहित्य निर्माण केले. भारत ते रशिया त्यांचा प्रवास झाला म्हणून ते "साहित्यरत्न" झाले. असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमल साळुंके यांनी केले.
खडकी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते.
अॅड. कोमलताई म्हणाल्या की, फकीरा शोधूनही सापडणार नाही, त्यामुळे फकीरा म्हणून जगण्यापेक्षा फकीरा होऊन जगा आणि समाजामध्ये नावलौकिक मिळवा, असा संदेश त्यांनी जयंतीच्या निमित्ताने युवकांना दिला.
प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर जी मोठी चळवळ उभी केली आणि संयुक्त महाराष्ट्रामध्ये लढ्याला चालण्याचे स्वरूप देऊन आंबेडकरवादी विचाराचा संदेश जगाला दिला. शेवटी त्यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून सांगितले की, जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर पुस्तके वाचा वाचाल तर वाचाल , हा संदेश त्यांनी दिला. तसेच बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. बापूसाहेब मेटकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या जयंतीच्या निमित्ताने माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे व कोमलताई साळुंखे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपण , वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. कोमलताई साळुंखे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे नगर येथील प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच रघुनाथ बेलदार, उपसरपंच उपसरपंच अशोक जाधव, सोसायटीचे चेअरमन जयसिंग राजपूत, माजी नगरसेवक विक्रम प्रकाश खंदारे, जनार्दन अवघडे, धरणगावचे ग्रामपंचायत सदस्य मारुती कुचेकर, डि के साखरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सौ. चंदनशिवे आदी उपस्थित होते.
