Advertisement
सोलापूर : आज 14 ऑगस्टची पहाट वेदना देणारी ठरली मराठा समाजाचे नुकसान करणारी घटना घडली असून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. माझ्यासारख्या अनेक मित्रांचा या घटनेवर विश्वास बसणे कठीण झाले प्रत्येकाचा मार्ग मृत्यूच्या मैदानातून जात असतो जन्म-मृत्यूच्या फेर्यात मोक्ष जीवाच्या साधनेला जावेच लागते परंतु असे दुर्दैवी अपघाती निधन यायला नको होते कारण एक कर्तबगार नेता प्रतिकूल परिस्थितीत राबणारा मराठा समाजाच्या वाटा आणि वळणं माहित असलेला परखड मताचा नेता आज पहाटे समाजाला न सांगताच आम्हा सगळ्यांना सोडून गेला याच्या मनाला तीव्र वेदना झाल्या एक महिन्यापूर्वी आम्ही मुंबई मध्ये भेटलो होतो मराठा आरक्षणासाठी आपण मिळून मुख्यमंत्र्यांना भेटूया अशी चर्चा झाली होती परंतु नियतीचे संकेत वेगळेच होते. बीड जिल्ह्याच्या राजकारणात असो अरबी समुद्रातील स्मारकाचे नेतृत्व असो विनायक रावांचा वावर राजकारणातला रुबाब वेगळाच असायचा वकुब असणारा नेता मराठी मुलखाला हरपला कुणाला काय वाटते याचा विचार न करता समाजहितासाठी उडी घेणारा नेता हरपला याच्या राज्यभरात सर्वांनाच मोठ्या यातना झाल्या.
“सारेच दीप कसे मंदावले आता
ज्योती विझू विझू झाल्या”
अशी भावना राज्यभरात निर्माण झाली आहे भारतीय जनता पक्षाचा सदस्य म्हणून स्वर्गीय विनायकरावांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी पांडुरंगा जवळ प्रार्थना करतो.
