Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाच्या सर्व आमदारांना विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यास सांगितलं आहे. तर आमदार संतोष बांगर यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. एकनाथ शिंदे यांची त्यांच्या गटाच्या आमदारांसोबत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. विरोधक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक झालेले बघायला मिळाले. त्यामुळे विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याचं या बैठकीत ठरलं. एकनाथ शिंदे यांनी स्वत: याबाबतचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे गटाचे आमदार संतोष बागर यांच्याबद्दल देखील चर्चा झाली. संतोष बांगर यांनी नुकतंच एका व्यवस्थापकाला मारहाण केल्याचं प्रकरण ताजं आहे. तसेच त्यांनी फोनवरही एकाला दमदाटी केल्याचा प्रकार ताजा होता. त्यांच्या अशाप्रकारच्या वागणुकीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील टीका केली होती. अखेर या प्रकरणाता वाद वाढत असल्याचं पाहून एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगर यांना सबुरीचा सल्ला दिल्याची माहीती सूत्रांनी दिलीय.
