Advertisement
नवी दिल्ली : भाजपचे (राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या संसदीय आणि निवडणूक समितीच्या नावाची घोषणा केली आहे. संसदीय समिती आणि निवडणूक समितीमधून नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचा समावेश निवडणूक समितीमध्ये करण्यात आला आहे.
भाजपच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, निवडणूकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या उत्तर प्रदेशमधून मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांचंही नाव या यादीत घेण्यात आलेले नाही. विशेष बाब म्हणजे भाजपमध्ये 75 वर्ष वय असलेल्या नेत्यांना मोठी पद दिली जात नाही. मात्र, 77 वय असलेल्या येडियुरप्पा यांना पक्षाच्या बोर्ड समितीत स्थान देण्यात आले आहे.
भाजपची निवडणूक समिती :
जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष), नरेंद्र मोदी] राजनाथ सिंह, अमित भाई शाह, बी. एस. येदयुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भूपेन्द्र यादव, देवेन्द्र फडणवीस, ओम माथुर, बीएल संतोष (सचिव), वनथी श्रीनिवास.
