Advertisement
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेचा वाद प्रलंबित आहे. हे प्रकरण पुढील चार ते पाच वर्षे न्यायालयात टीकेल असं सूचक वक्तव्य शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी केलं होतं. त्यांच्या या वाक्यामुळे शिंदे गट अडचणीत आला आहे. दरम्यान, भरत गोगावले यांच्या या वक्तव्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन गटातील सर्वच पदाधिकारी आणि आमदारांना तंबी दिली आहे.
शिंदे गट या वक्तव्यामुळं अडचणीत येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर कोणीही भाष्य करू नये असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरयांनी दिली. तसेच न्यायालयाच्या कामकाजाचे व निर्णय हे भाजपा व शिंदे गटातील आमदारांना आधीच कसे माहित पडते? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
