Advertisement
सोलापूर : सोलापूर जिल्हा
परिषद समाजकल्याण विभागाची चौकशी करताना दलितवस्त्यांच्या विकासकामामध्ये तफावत
असल्याचे दिसून आले आहे, असे समाजकल्याण आयुक्तालयातील विशेष अधिकारी मनीषा फुले
यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाकडून समाजकल्याण विभागातील विविध योजनांची
चौकशी सध्या सुरू आहे. एका पथकाकडून हे चौकशी सुरू आहे. यानुसार फायलींची कडक
तपासणी केली जात आहे. यानुसार आतापर्यंत 12 तक्रारी प्राप्त झाल्या त्यातील काही
किरकोळ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. मोहोळ, अक्कलकोट आदी ठिकाणाच्या
दलितवस्ती सुधार योजना कामकाजाची तपासणी करण्यात आली आहे. कामात तफावत असणाऱ्यांचा
आहवाल समाजकल्याण आयुक्तांकडे सादर करणार असल्याचे मनीषा फुले यांनी सांगितले.
दरम्यान, समाजकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या दलितवस्ती विकास योजनेची
कामे वाटताना टक्केवारी घेतल्याचा आरोप आमदार राम सातपुते यांनी केला होता. डिपीसी
ठरावाची प्रतची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सदस्यांनी ही
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले
होते.
