Advertisement
मुंबई : शिवसेना आमदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसले. अनेक पदाधिकारी आणि खासदारांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली. आता उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युतीची घोषणा केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त तीन शब्दांत प्रतिक्रिया देत खोचक टोला लगावला आहे. 'विनाशकाले विपरीत बुद्धी' अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान त्यानी सध्याच्या इतर घडामोडींवरही प्रतिक्रिया दिली आहे. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, की काँग्रेस ही डुबती नाव आहे.
दरम्यान, अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टवर कारवाईसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. ते मुंबईतून मांडवी एक्स्प्रेसने दापोलीच्या दिशेने रवाना झाले आहेत. याबाबतही फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, याबाबत काहीही बोलणं फडणवीसांनी टाळलं. याबाबत मला काहीही माहिती नाही, असं म्हणत फडणवीसांनी या प्रकरणावर काहीही बोलणं टाळलं.
