Advertisement
सातारा : राज्यपाल भगवान कोश्यारी यांना महाराष्ट्राचा जर तिटकारा असेल तर त्यांनी येथे न थांबता दुसऱ्या राज्यात जावे, अशी सणसणीत टिका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मिडियाद्वारे केली आहे . कोश्यारी यांच्या वक्तव्याचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत . उदयनराजे यांनी राज्यपालांचा जोरदार समाचार घेतला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळं अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर राज्यपाल बोलताना म्हणाले होते, ‘गुजराती आणि राजस्थानी लोकांना मुंबई आणि ठाणे शहरातून हाकलून दिल्यास इथे काहीही शिल्लक राहणार नाही. देशाची आर्थिक राजधानी असल्याचा टॅगही मुंबईतून हिसकावण्यात येईल.’ आता या वक्तव्यावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली.
उदयनराजे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने देशाला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे याच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. इतकंच नाही तर अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून उभारलेल्या महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यांत जावे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
