Advertisement
नवी दिल्ली : लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारने उचललेल्या विविध पावलांबाबत सवाल उपस्थित केला आहे. जीएसटीबाबत त्या म्हणाल्या की, मविआ सरकारने आधीच पत्र दिलं होतं, GST बाबत निर्णय करू नका. मात्र त्यांचं ऐकण्यात आलं नाही. नोट बंदी झाली, मी आर्थिक तज्ज्ञ नाही, पण ATM व्यवहार केल्यावर आपलेच पैसे द्यावे लागतात. नवं डेबिट कार्ड, बँक स्टेटमेंट, चेक बूक यासाठी चार्जेस का घेतले जातात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आमच्याकडूनही चुका झाल्या असतील. पण काम करणाऱ्यांकडूनच चुका होतात. UPA च्या काळात सिलिंडर 300, 400 रुपये होता. पण, आता 1 हजार हा जादूचा आकडा बाजारात आहे. मात्र, पोट हे आकड्यांनी भरत नाही ते धान्यांने भरतं. एका अध्यक्षांनी मला, मी महिला असल्याने घरी जायला सांगितलं होतं. भर संसदेत सुप्रिया सुळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला.
