#

Advertisement

Wednesday, August 3, 2022, August 03, 2022 WIB
Last Updated 2022-08-03T17:40:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची ५ ऑगस्टला शक्यता

Advertisement



मुंबई : आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. येत्या ५ ऑगस्टला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच नव्या मंत्र्यांचा शपथविधी हा राजभवनात पार पडणार आहे, असे हे सांगण्यात आले आहे. आजच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलं होतं. मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारपर्यंत नक्की होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल, परंतु त्याची तारीख जाहीर करण्याचा अधिकार मला नाही आहे, तो आमच्या मुख्यमंत्र्यांना आहे, लवकरच महाराष्ट्रात भाजप आणि सेना युतीच मंत्रिमंडळ स्थापन होईल, अशी माहिती शंभुराज देसाई यांनीही दिली होती.सूत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार, १५ मंत्री शपथ घेऊ शकतात. भाजप गटातील 8 आणि एकनाथ शिंदे गटातील ७ मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे सरकारला एक महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाला, मात्र सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्व कामकाज पाहत आहेत. दोघे जण सर्व कारभार पाहत असल्याने एक दुजे के लिए असाच यांचा कार्यक्रम दोघांचा चाललेला आहे, अशी ही टीका विरोधकांनी केली आहे.