Team Lakshvedhi
Last Updated
2022-08-08T11:23:48Z
अब्दुल सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम कुणी केला?
Advertisement
औरंगाबाद : सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार त्यांच्या बिनधास्त बोल आणि राजकीय भूमिकांमुळे सतत चर्चेत असतात. TET घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नाव आल्याने आज सत्तार पुन्हा चर्चेत आलेत. अब्दुल सत्तार बिनधास्त नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्यात अब्दुल सत्तार पाहिले नेते, सत्तार हे शिंदे सरकार मध्ये मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा 60:40 फॉर्म्युला ठरल्याने शिंदे गटाला 16 किंवा 17 मंत्री पद मिळणार आहेत. 50 जणांमध्ये 17 मंत्री पद विभागणे शिंदे यांच्यासाठीही अडचणीचे आहे. 17 जणांमध्ये आपले नाव लागावे यासाठी धडपड सुरू आहे. सर्वच बंडखोर मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून 5 बंडखोर आहेत. या 5 जणांमधून केवळ दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. सत्तार यांचा मंत्रिमंडळामध्ये प्रबळ दावा असल्यानेच नेमकी आज लिस्ट आली आणि लिस्ट मध्ये सत्तार यांच्या चार अपत्यांची नावही आली. हा योगायोग नाही. सत्तार यांच्या मार्गात काटे टाकण्याचे राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा आहे. औरंगाबाद मधून मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी अब्दुल सत्तार, संजय सिरसाट, संदीपान भुमरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. जिल्ह्याला दोन मंत्रिपद आणि पालकमंत्री मिळणार आहे. स्पर्धेत तिघे असल्याने एकाचा पत्ता कापणे आवश्यक आहे, जेणेकरून इतरांचे मंत्रिपद पक्के होईल.