Advertisement
ल्लीवारी करून परतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सकाळी विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विधानभवनातील हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप आणि शिंदे गटातील पहिल्या फळीतले नेते शपथ घेणार आहे. त्यामुळे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे मुंबईला रवाना झाले आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे सुद्धा तातडीने मुंबईला रवाना झाले आहे. भाजपकडून आतापर्यंत गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील यांना निरोप देण्यात आला आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत आणि संजय शिरसाट यांना निरोप देण्यात आलेला आहे. संजय शिरसाट हे औरंगाबादहून मुंबईला निघाले आहे.
