Advertisement
मुंबई : सिंचन घोटाळा प्रकरणीचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या क्लीन चीटचा अहवाल उच्च न्यायालयाने स्वीकारलेला नाही. उच्च न्यायालयासमोर हा अहवाल अजूनही प्रलंबित असल्याची माहिती आता समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळीच शपथ घेऊन सरकार स्थापन केले होते. शपथ घेताच अजित पवार यांना सिंचन घोटाळा मध्ये क्लीन चीट देण्यात आली होती.
सिंचन घोटाळ्याचा अहवाल उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असेल तर, यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला. या प्रकरणात भाजपने अजित पवार आणि सुनिल तटकरे यांचं नाव घेत राज्यभर आंदोलनं केली. एकीकडे सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट मिळाली नसल्याचं समोर येत असतानाच, काल मोहित कंबोज यांनी केलेल्या काही ट्वीटमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत.
