#

Advertisement

Wednesday, August 17, 2022, August 17, 2022 WIB
Last Updated 2022-08-17T17:44:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्या बंगल्यावर मोठ्या घडामोडी

Advertisement

मुंबई : राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सागर बंगल्यावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजप नेते मोहित कंबोज आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्या. रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर 10 मिनिटांनी मोहित कंबोज फडणवीसांच्या बंगल्यावर गेले. रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांची फडणवीस यांच्याशी संयुक्त भेट झाली नाही. पण या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. कालच मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याबाबत ट्वीट करून खळबळ उडवून दिली होती. 
रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकासआघाडी सरकार असताना गंभीर आरोप करण्यात आले होते. 2019 विधानसभा निवडणूक आणि सत्तास्थापनेदरम्यान रश्मी शुक्ला यांनी नेत्यांचे फोन टॅप केले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. महाविकासआघाडी सरकारने याप्रकरणी रश्मी शुक्ला यांना आरोपीही केलं. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये नियुक्तीवर आहेत.