Advertisement
वालचंदनगर : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची 100वी जयंती मोठ्या उत्साहात करण्याचे नियोजन होते. परंतु, कोरोना काळ असल्याने शासकीय निर्बंधातून यावर मर्यादा आल्या. पण, आज 102वी जयंती साजरी करता मोठा आनंद होत आहे. मात्र, आपला समाज अद्यापही समस्या, अडचणीतून जात आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अण्णा भाऊंचे साहित्य प्रत्येकाने अभ्यासने गरजेचे आहे. किमान त्यांनी लिहलेले एक तरी पुस्तक, कांदबरी वाचावी, असे आवाहन बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात वालचंदनगर येथे बहुजन रयत परिषदेचे शाखा उद्घाटन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा तसेच शालेय साहित्य वाटप उपक्रमाचे आयोजन ओंकार खुडें आणि लक्ष्मण चांदणे यांनी केले होते.शाखा उद्घाटन ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे तसेच प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी "सूर नवा ध्यास नवा'च्या उपविजेत्या राधा खुडे, जंक्शन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांच्यासह वालचंदनगर परिसरातील बहुजन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच शालेय साहित्य वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गरजू, होतकरून बांधवांना हलगी वाद्याचे वाटप करण्यात आले.
ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, राज्यातील दौरा बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून गेली दोन वर्षे सुरू आहे. या दौऱ्यात बहुजन समाजाच्या विविध समस्या समोर येत आहेत. त्यातही मातंग समाजासारख्या तळागळात वावरणाऱ्यांच्या समस्या कायम आहेत, समाजावर होणार अन्याय वाढला आहे. विशेषत: तरूण आणि स्त्रीयांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ही परिस्थिती का उद्भवली याचा विचार करावा, आता अन्याय सहन करू नका. साहित्यरत्न अण्णा भाऊ यांनी आपल्या साहित्यातून याबाबतचा उहापोह केला असल्याचेही ऍड. कोमलताई यांनी अण्णा भाऊ यांच्या काव्य पंक्तीतून स्पष्ट केले. यावेळी त्यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर तसेच त्यांच्या सहित्य संप्रदेवरही प्रकाश टाकला. बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. आयोजक आयोजन ओंकार खुडें आणि लक्ष्मण चांदणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आजारी असूनही "ताई' आल्या
बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई या आजारी असतानाही शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आल्याचे तसेच गेली दोन-तीन वर्षे त्या समाजासाठी महाराष्ट्रभर फिरत असल्याचे तसेच समस्या समजून घेत असल्याचे आयोजकांकडून नमूद करण्यात आले. यावेळी उपस्थितांनीही टाळ्यांच्या कडकडाट "ताईं'ना दाद दिली. यावेळी हलगीच्या सुरात परिसर दणाणून गेला.

