Advertisement
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याची सुनावणी न्यायालयात झाली. यासाठी राऊत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. मेधा सोमय्या यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी संजय राऊत यांनी आपल्यावरील आरोप निराधार, खोटे असल्याचं सांगितल.
संजय राऊत यांची वक्तव्ये सकृतदर्शनी मानहानीकारक आहेत, अशी टिप्पणी करत शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश याआधी दिले होते. मात्र, संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडींतर्गत आर्थर रोड जेलमध्ये असल्याचं मेधा सोमय्या यांचे वकील सनी जैन यांनी सांगितलं. त्यानंतर न्यायाधीशांनी राऊत यांना व्हि़डिओ कॉनफरंसिंगद्वारे हजर करण्याचे निर्देश दिले. यानंतर राऊतांना विचारणा करण्यात आली की तुम्हाला हे आरोप मान्य आहेत का? न्यायाधीशांच्या या प्रश्नावर उत्तर देत राऊत यांनी हे आरोप अमान्य असल्याचं सांगितल\
