Advertisement
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या पत्राचाळ प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत असून ऑर्थर रोडमध्ये मुक्कामी आहे. या प्रकरणात आता ईडीने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. ईडीच्या दोन टीमकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईबद्दल गुप्तता बाळगण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणामध्ये ईडी पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यानंतर राऊतांना 22 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आज ईडीने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापे मारले आहे. कोण कोणत्या ठिकाणी छापे मारण्यात आले आहे, याबद्दल गुप्तता बाळगण्यात आली आहे. मात्र, पत्राचाळ प्रकरणामध्येच ही कारवाई सुरू आहे. एकूण 2 टीमकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आलेली आहे.
