Advertisement
औरंगाबाद : औरंगाबाद शहरांमध्ये अग्नीवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांचे हाल सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातल्या विद्यापीठाच्या मैदानावर अग्नीवीरांची भरती सुरू आहे. यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून तरुणांची अलोट गर्दी लोटली आहे. मात्र, या तरुणांना ना राहण्याची, ना खाण्याची, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. तर, मुलांना 10 रुपयांची पाण्याची बॉटल 30 रुपयाला घ्यावी लागली. त्यामुळे रस्त्यावरती मिळेल तिथे हे तरुण झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे भावी जवानांचे कसे हाल सुरू आहेत ही परिस्थिती समोर आली आहे. तर भविष्यात देश ज्यांच्या हातात सुरक्षित राहणार आहे अशा तरुणांना रात्रभर रोडवर झोपून न पाणी पिता आणि न काही खाता रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये पुरुष उमेदवारांसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेत सैन्य दलाला जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती मदत केली जात आहे. सैन्य दलाच्या अग्नीवीर भरती प्रक्रियानुसार विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ या दहा जिल्ह्यांमध्ये सैन्य दलातील काही पदांची भरती सुरू करण्यात आली आहे.
