Advertisement
मुंबई : शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या अडचणीत भर पडली आहे. दिघे यांना मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावलं आहे. बलात्कार प्रकरणातील पीडित व्यक्तीला धमकावण्याचा गंभीर आरोप आहे. या आरोपामध्ये केदार यांची चौकशी होणार आहे. केदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात केदार दिघेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. दिवंगत शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या कामामुळे ठाण्यात शिवसेनेचा पाया भक्कम झाला. पण आता परिस्थिती वेगळी आहे. ठाण्यातील सर्व नगरसेवकांचा शिंदेंना पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत आनंद दिघे यांच्यासोबत रक्ताचं नातं असलेले केदार दिघे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.
