Advertisement
मुंबई : चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून पक्ष संघटनेबरोबरच आगामी निवडणुकांमध्ये भाजपच कसा सरस राहिल याचे ते नियोजन करीत आहेत. त्यासाठी आवश्यक आहे ते पक्ष संघटन, त्याअनुशंगानेच चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यभर दौरा करीत आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी ते आतापासूनच लोकसभेची गणिते मांडत आहेत. हे सर्व होत असतानाच त्यांनी पंकजा मुंडे यांची घरी जाऊन भेट घेतली. एकाच पक्षातील दोन नेत्यांची भेट यामध्ये नाविन्य असे काहीच नाही पण गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे ह्या नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पक्षाकडून वेळोवेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आरोपही राहिलेला आहे. या दरम्यानच प्रदेशाध्यक्ष थेट घरी जाऊन भेटले म्हणजे राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच. पण त्या नाराज नाहीत आणि यापूर्वीही नव्हत्या, एवढेच नाहीतर त्यांनी आता भाजपासाठी पूर्ण वेळ काम कऱण्याचे आश्वासन दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.
