Advertisement
मुंबई : राज ठाकरेंनी शस्त्रक्रियेनंतर घेतलेल्या आपल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंवरही सडकून टीका केली आहे. राज ठाकरेंनी जुन्या बैठकीची आठवण करून देत उद्धव ठाकरेंनाच सवाल केला आहे. तुमचे आमदार कमी असताना तुम्ही मुख्यमंत्रिपद मागताच कसं? असा सवाल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
राज ठाकरे म्हणाले, 'मुळात तुम्ही मुख्यमंत्रिपद मागितलं कसं? ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं ठरलं असताना तुम्ही ही मागणी केलीच कशी? पंतप्रधान मोदी जेव्हा भाषण करत होते, त्यावेळी उद्धव ठाकरेसुद्धा व्यासपीठालर बसलेले होते. भाषणात मोदींनी सांगितलं सत्ता आल्यावर फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. अमित शहांनीसुद्धा तेच सांगितलं. मग त्यावेळी आक्षेप का घेतला नाही? त्याच वेळी फोन का केला नाही? त्याचवेळी भेटला का नाही? तुम्ही मला वेगळं सांगितलं आणि आता वेगळं बोलत आहात, असं का म्हणाले नाहीत. निकाल लागल्यावर सगळंच कसं आठवलं? असा सवाल राज यांनी केला.
ते म्हणाले 'नंतर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं.मग लोकांनी मतदान कुणाला केलं होतं? असं समजूया शिवसेना आणि भाजपला मतदान करणारे लोकं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करणारी लोकं. लोकांना असं वाटत असेल, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
