Advertisement
मुंबई : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाले नाही. आता 3 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर 2 ते 4 दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिला आहे.
शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं.
अजित पवार यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. लवकरच राज्यपालांना भेटून मंत्रिमंडळाची माहिती दिला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून गैरसमज पसरवला जात आहे, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळांची उद्या बैठक झाल्यावर विधिमंडळ कामकाज समितीची BAC बैठक होणार आहे. याचा अर्थ पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यात घेण्यासंदर्भात राज्य सरकारचे हे स्पष्ट संकेत आहेत. जर राज्य सरकार असं नियोजन करत असेल तर त्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ही होणार हे देखील स्पष्ट आहे.
