Advertisement
सोलापूर : कामगारांचा पीएफ आणि शेतकऱ्यांची एफआरपी ज्या साखर कारखान्यांनी भरली नाही, अशा कारखान्यांना साखर आयुक्ताने नोटीसा काढल्या आहेत. जर शेतकऱ्यांची एफआरपी भरली नाही तर गाळप हंगामालाच परवानगी मिळणार नाही, असा साखर आयुक्तांनी दणका दिला आहे. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची एफआरपी 15 कोटी रुपये देणे शिल्लक राहिली होती. जसे बीजरगीच्या दरबारात खळखळा मोहरा ओतल्या होत्या आणि मोजून पावती करण्यासाठी बजावले होते. त्या पांडूरंगाचा अवतार घेऊन त्यावेळच्या चेअरमनने पांडूरंगाचे रूप घेऊन दामाची पंताला मोकळे करतील, असे वाटले होते. त्यासाठी आमदार साहेबांनी प्रयत्न केला होता. परंतू, कामाच्या व्यापात दामाजीची 15 कोटीची एफआरपी भरणे राहून गेले आहे. अर्थात दामाजीचे कर्ज 5 वर्षात 50 कोटीवरून 200 कोटीवर कर्ज पोहोचले. अखेर 5 वर्षापूर्वीची जेसीबीची बकेट पोकलानमध्ये रूपांतरीत झाली. कारण स्वतः आमदार साहेबांनी व्यवहार बघितला असता तर कर्ज वाढीत काटकसर झाली असती परंतू, कारखान्यातले सगळेच प्रभारी अधिकारी असल्यामुळे आमदारांच्या व्यापाचा गैरफायदा घेतला आणि लहान लोकांना संधी मिळाल्यामुळे व्यवहारात धोका दिला.
आदरणीय आमदार साहेब सतत सत्त्याच्या बाजूने उभे राहिले. आमदार साहेबांना खोटे कधीच पडले नाही. तरी देखील आमदारांच्या हाताची दानत मोठी असून अखेर 3.33 टक्के व्याजदराने अर्थात वर्षाला 40 टक्के व्याजाने 28 कोटी रुपये काढले आणि आमदारांना शेतकऱ्यांना वाहतूकदारांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अर्थात किरकोळ गोष्टीत आमदार साहेब लक्ष घालत नव्हते, त्यामुळे व्याजाची आणि कर्जाची रक्कम अखेर वाढतच गेली. कोणताही गाजावाजा न करता. दामाजी साखर कारखान्याची वाटचाल निलावाच्या वाटेवरच होती. कारण, विठ्ठल सहकारी आणि दामाजी सहकारी जुळ्या भावंडासारखी कर्जाच्या स्पर्धेत वाटचाल करीत होती. कारण दोन्ही साखर कारखाने भाडेतत्वावर चालवायला मिळावेत, असे अनेक धनिक उद्योगपतींना वाटत होते. परंतू, या सर्व संकटाचा विचार करून दामाजीच्या मनात आणि मंगुड्याच्या मनात काही वेगळेच ठरवून टाकले होते. आज रोजी दामाजी आणि विठ्ठल सहकारी मोठ्या कष्टाने चिकाटीने गाळप हंगाम सुरू करणे अगत्याचे आहे.