#

Advertisement

Thursday, August 4, 2022, August 04, 2022 WIB
Last Updated 2022-08-04T13:15:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

संजय राऊत इडी प्रकरणात "सस्पेन्स"

Advertisement


मुंबई :
 पत्राचाळ प्रकरणी इडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊत यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. आज, कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये इडीच्या वकिलांनी काही मुद्दे मांडले. संजय राऊतांसोबत समोरा समोर एका व्यक्तीची चौकशी करायची आहे, असं वकिलांनी कोर्टाला सांगितलं. इडीच्या वकिलांनी या व्यक्तीचं नाव घ्यायला नकार दिला, त्यामुळे याप्रकरणात नवा सस्पेन्स तयार झाला आहे. 'आम्ही एका व्यक्तीला चौकशीसाठी बोलावलं आहे, ज्या व्यक्तीचं नाव आम्ही इकडे घेऊ शकत नाही. त्या व्यक्तीला आणि राऊतांना समोरा समोर बसवून चौकशी करायची आहे,' असं इडीचे वकील म्हणाले. आज झालेल्या सुनावणीमध्ये वकिलांनी आणखी काही आरोप केले. 'प्रविण राऊत यांना मिळालेल्या 112 कोटी रकमेपैकी काही रक्कम रोख स्वरुपात मिळाली आहे. तसंच नॅशनल आणि इंटर नॅशनल प्रवासाकरताही प्रविण राऊतने राऊत परिवाराला पैसे दिले आहेत. प्रविण राऊत दर महिन्याला संजय राऊत यांना 2 लाख रुपये देत होता,' असा दावा इडीने केला आहे.