Advertisement
पुणे : महाविकास आघाडी सरकार असताना पुरंदर तालुक्यातील अनेक विकास कामे पळवले. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीच बोलले नाहीत, अशी टीका माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केली. विशेष म्हणजे शिवतारे यांनी यावेळी अजित पवारांनी पुरंदरमधून बारामतीत काय काय पळवलं याची यादीच वाचून दाखवली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुण्यातील सासवड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी देखील भाषण केलं. यावेळी त्यांनी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या कार्यक्रमाला माजी मंत्री उदय सामंत, तानाजी सावंत, विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शहाजी पाटील उपस्थित होते. पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी मी मंत्री असताना मंजूर करून आणलेली गुंजवणी पाणी योजना मविआ सरकार येताच अजित पवारांनी बारामतीला पळवून नेली आणि या पुरंदरचा गाढव आमदार तोंडातून एक शब्द काढत नाही. राष्ट्रीय कृषी बाजारही पवारांनी तिकडे हवेलीला पळवला. तरीही मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे का गप्प बसले?, असा सवाल विजय शिवतारे यांनी केला
