Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबतच्या शिवसेना आमदारांसोबत मंगळवारी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्याची शिंदे-फडणवीस सरकाराने गंभीर दखल घेतली. यावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी आता शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा वाढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवारी माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. यानंतर शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा वाढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालकांना या संदर्भात आदेश देण्यात आले. या बैठकीला पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलीस महासंचालक रजनीश सेट उपस्थित होते. पोलिसांच्या घरांच्या प्रश्नावरही कॅबिनेट बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
