Advertisement
मुंबई : सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यामुळे पुन्हा एकदा बाजारात सोन्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. मंगळवारी बाजार बंद होईपर्यंत सोन्याच्या दरात काहीशी वाढ झाली होती. मात्र आज बाजार उघडताच पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 51 हजार 486 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 51 हजार 549 रुपये प्रति तोळ्यावर बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 63 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे.
आजही सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,714 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. आज चांदीचा दर 57057 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 57904 प्रति किलो दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 847 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे.
