Advertisement
मुंबई: मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली नसल्याने प्रशासन चालवताना अडचणी येत आहेत. माझ्याकडे विरोधीपक्ष नेते म्हणून अकरावीचे विद्यार्थी प्रवेशासंदर्भातील अडचणी सोडवण्याची मागणी करत आहेत. यासाठी आम्ही राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटत आहोत. त्यांच्याकडे अधिवेशन घेण्याची मागणी करण्यात आली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार लवकर करू, लवकर करू हे सांगणे बंद करा, असा सल्ला शिंदे आणि फडणवीसांना अजित पवार यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील सरकार दिल्लीहून चालत आहे. दिल्लीतील आदेशाशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणताही निर्णय घेता येणार नाही. या दोघांच्या हातात आता काहीच उरलं नाही. दिल्लीवारी केल्याशिवाय राज्य सरकार चालू शकत नसल्याने मुख्यमंत्री सारखे दिल्लीला जात आहेत, असंही ते म्हणाले.
