#

Advertisement

Saturday, August 6, 2022, August 06, 2022 WIB
Last Updated 2022-08-06T12:06:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शरद पवार शांत का? भुजबळांनी दिलं उत्तर

Advertisement



नाशिक : शिवसेना नेते संजय राऊत यांना इडीने  पत्राचाळ  गैरव्यवहारप्रकरणी अटक केली आहे. संजय राऊत यांच्या अटकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राऊतांच्या अटकेवर शरद पवारांच्या या मौनावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असं काही नाही, लोकसभेतही इडीच्या कारवायांसंदर्भात राष्ट्रवादी बोलते. सुप्रियाताई बोलतायत. अनेक विरोधी पक्षांनी हा कायदा राक्षसी असल्याचं म्हणलं आहे. पण हा कायदा युपीएच्या काँग्रेसच्याच काळात बनवला गेला आहे. चिदंबरम साहेबांनीच हा कायदा बनवला आहे, त्यामुळे भाजप तरी काय करणार, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे.