Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठाण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत असतानाच दुसरीकडे त्यांचे नातू रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये 10-15 मिनिटं चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत भेटीचं कारण सांगितलं. विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा एक निर्णय मांडला होता. युरोपमध्ये जगदंबाची तलवार आहे, अनेक अशा वस्तू बाहेर आहे. त्या भारतात कशा आणाव्या, याबद्दल आम्ही चर्चा केली. तसंच पोलिसांच्या सुट्टीबद्दल आम्ही चर्चा केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ईडीच्या रडारवर आल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, त्यामुळे रोहित पवार आणि शिंदे-फडणवीस भेटीच्या टायमिंगाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.
