Advertisement
नाशिक : महाविकास आघाडीतःतिन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेवरुन काँग्रेस नाराज झाली आहे. 'महाविकास आघाडी नैसर्गिक युती नाही, ना कोणतीही पर्मनंट आघाडी नाही. विपरीत परिस्थितीत एकत्र आलेले पक्ष आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची चिन्ह आहे. आघाडी असेल तर सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारुन केल्या पाहिजे. आपल्या मताने गोष्टी करायच्या तर त्याला आघाडी म्हणत नाही. 'पहाटेचे सरकार पडले तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते म्हणून आम्ही सरकारमध्ये आलो. आमची आघाडी विपरीत परिस्थिती मध्ये झाली होती. आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य आहे. आमची काही नैसर्गिक युती नाही, चर्चा करून निर्णय घ्यायला हवा आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत. पण हे साधं बोलायला विचारायला तयार नाही, अशी टीकाही पटोलेंनी सेनेवर केली.
मला ज्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगितलं तेव्हा मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगायला गेलो होतो. पण त्यांना औपचारीकता पाळायची नसेल तर ठीक आहे. कोणावर जबरदस्ती नाही. काँग्रेस हा जनतेतला पक्ष आहे. निश्चितपणे जनता काँग्रेस सोबत आहे.
