#

Advertisement

Friday, August 12, 2022, August 12, 2022 WIB
Last Updated 2022-08-12T10:51:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मंत्रालयातलं 602 नंबरचं केबिन अनलकी ?

Advertisement

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी शपथ घेतल्यानंतर 39 दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण अजूनही या मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. मंत्र्यांना सुरूवातीला कार्यालय द्यायला हवं, याचं काम सुरू आहे. मात्र, केबिन नंबर 602 घ्यायची हिंमत कोण दाखवणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाविकासआघाडी सरकारमध्ये हे केबिन कुणालाच देण्यात आलं नाही.
मंत्रालयातलं 602 नंबरचं हे केबिन घ्यायला अनेक मंत्री धजावत नाहीत, कारण, हे केबिन अनलकी असल्याची अंधश्रद्धा त्यांच्या मनात बसली आहे. 602 नंबरचं हे केबिन जवळपास 3 हजार चौरस फुटांचं आहे. या केबिनमध्ये एक कॉन्फरन्स रूम, कर्मचाऱ्यांसाठी हॉल आणि दोन मोठ्या केबिन आहेत.

602 नंबर केबिनचा इतिहास : 
2014 साली एकनाथ खडसे  यांना हे केबिन देण्यात आलं होतं. याच कार्यालयातून खडसे यांनी महसूल, कृषी आणि अल्पसंख्याक विभागाचं काम केलं. पण दोन वर्षांनी एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.
खडसेंच्या राजीनाम्यानंतर पांडुरंग फुंडकर यांना कृषी खात्याचा कारभार आणि हे केबिन देण्यात आलं, पण 2018 मध्ये फुंडकर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.
फुंडकरांच्या मृत्यूनंतर 2019 मध्ये अनिल बोंडे यांना कृषीमंत्री बनवण्यात आलं आणि त्यांनाही केबिन नंबर 602 देण्यात आलं. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये अनिल बोंडे यांना पराभवाचा धक्का बसला.