Advertisement
नाशिक : राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चीट मिळाली नसल्याचं समोर येत असतानाच या प्रकरणात नवे ट्विस्ट आले आहे. या प्रकरणी एका माजी अधिकाऱ्याने मोठा आरोप केला आहे.
सिंचन घोटाळ्याची मागील 10 वर्षात काहीही चौकशी झाली नाही. सिंचन घोटाळाप्रकरणी फक्त कारवाईचे नाटक करण्यात आले. सिंचन घोटाळा प्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मात्र, आरोपींवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. सिंचन घोटाळा उघड करणारे जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी हा धक्कादायक आरोप केला आहे. नागपूर खंडपीठासमोर परमबीर सिंग यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांना क्लिनचीट देण्यात आली होती, असेही ते म्हणाले. मोहित कंबोज यांच्या पाठोपाठ विजय पांढरे यांची या प्रकरणात एन्ट्री विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
