Advertisement
मुंबई : शिंदे आणि भाजप सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. मात्र, आज अखेर या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारावेळी काही केसेस दाखल असलेल्या आमदारांनीही शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या आमदारांवरून केस बंद केल्या गेल्या का? असा सवाल उपस्थित होत आहे.
संजय राठोड : पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या संजय राठोड यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संजय राठोडांवरच्या केस बंद करण्यात आल्या आहेत. राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेताच चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
विजयकुमार गावित : माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गावित यांच्यावर २००४ ते २००९ या काळात मंत्रीपदी असताना आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
अब्दुल सत्तार : अब्दुल सत्तार यांच्याबद्दलची मोठी बातमी समोर आली होती. टीईटी घोटाळा प्रकरणातील यादीत अब्दुल सत्तार यांच्या मुली आणि मुलांचही नाव होतं. टीईटी घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळ्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सत्तार यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
