#

Advertisement

Friday, August 5, 2022, August 05, 2022 WIB
Last Updated 2022-08-05T11:22:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना दिली होती ऑफर !

Advertisement



मुंबई :  झाले गेलेले सर्व विसरून बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदेंना सोडून एकत्र या, आपण भाजपसोबत आघाडी करू, अशी ऑफर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली होती. असा दावा शिंदे गटावे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. या गोष्टीला भाजप आणि आम्ही ५० आमदार तयार नव्हतो, कारण हे सर्व योग्य ठरले नसते असे दीपक केसरकरांनी आज पत्रकार परिषद घेत सांगितले.
शिवसेना एकत्र रहावी यासाठी आमच्याकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेतील नंबर दोनच्या माणसाला बाजूला सारा आणि तेही केवळ तो भाजपसोबत युती करावी म्हणतोय म्हणून हे सर्व अतिशय चुकीचे असल्याचे मत व्यक्त करत दीपक केसरकरांनी ठाकरेंवर टीका केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची चर्चा सुरू होती, यातुन कुटुंबप्रमुख कसा असावा हे पंतप्रधानानी दाखवून दिले होते. त्यांच्या मनात बाळासाहेबांच्या आदर हा दिसून येत होते. यातून उद्धव ठाकरे पदाचा त्याग करणार होते. मात्र, कार्यकर्त्यांना हे सांगावे यासाठी खूप वेळ गेला यातच १२ जणांचे निलंबन करण्यात येत आल्याने भाजप नाराज झाल्याचेही यावेळी दीपक केसरकरांनी सांगितले.