Advertisement
मुंबई : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करत होते. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी आमच्या अंगावर आला तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेऊ, असा थेट इशारा विरोधकांना दिला.
भरत गोगावले म्हणाले कि, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. डरपोक आहोत काय? असं भरत यांनी म्हटलं. शिंदे गटातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या नादी लागू नका आमच्या अंगावर आला तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेऊ. पिक्चर अभी बाकी है! हा फक्त ट्रेलर आहे असल्याचा थेट इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. ते आमच्या अंगावर आले नाही त्यांच्या अंगावर आम्ही गेलो होते. आम्हाला पाय लावायचा विचार केला तर सोडणार नाही असेही ते म्हणाले.
