Advertisement
उमरगा : मुरूम येथील श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्यास बहुजन रयत
परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सदिच्छा भेट
दिली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या प्रशासकीय कामाची माहिती घेतली. ऊस उत्पादक
शेतकरी, कारखान्यातील कामगार यासह अन्य मुद्यांवरही त्यांनी चर्चा केली.
यावेळी
महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश युवक उपाध्यक्ष शरणजी पाटील यांच्या हस्ते ऍड.
कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आणि प्रदेश सरचिटणीस ईश्वर
क्षीरसागर यांनाही सन्मानित करण्यात आले.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या
102वी जयंती निमित्त ऍड. साळुंखे-ढोबळे या उमरगा दौऱ्यावर असताना त्यांनी सदर
कारखान्यास भेट देत माहिती घेतली. यावेळी उमरगा पंचायत समितीचे मा. सभापती सचिन
पाटील, मा. नगरसेवक महेश माशाळकर, उस्मानाबाद कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा युवक
सरचिटणीस राजू मुल्ला, उमरगा तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरज वाघ, माजी
नगराध्यक्ष बबनराव बनसोडे, बहुजन रयत परिषदेच्या उस्मानाबाद महिला आघाडीच्या जिल्हा
अध्यक्षा सरोजा क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
